बा

Started by sanjweli, July 16, 2017, 08:46:19 PM

Previous topic - Next topic

sanjweli

*फादर्स डे च्या निमित्ताने केलेला छोटासा प्रयत्न*

दि.१८/६/१७

               "बा"

ना उमगणार कुणा बा'ची महती कधी
मावणार ना माहा 'बा'शब्दामंदी

समिंदराची तो सावली
आभाळाची हो माया त्याची

संस्कार हे 'बा' ची आम्हा शिदोरी
'बा च्या 'तळहाताचा फोड आम्ही सारी

काया सारी कष्टानं झिजली
मान ना कुणापुढं कधी तुकवली

ऋणानुबंध ना नातीगोती
पसरलं ना हात कुणा पुढं कधी

रचला पाया जिद्द न्यारी
डौलमौल तोरा उभी दुनिया आता सारी

काट्याकुट्याची वाट जरी जीवनाची
त्यात उभी माही विठु माऊली.

          ##लाव्हा##

©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143