सैराट

Started by sanjweli, July 16, 2017, 09:12:18 PM

Previous topic - Next topic

sanjweli

२८ एप्रिल २०१६

सैराट

सांग कंच वारं
भिनल माह्या अंगामंदी,

शिरलं पिरतीच खूळ
कसं माह्या डोक्यामंदी,

दिन रात सदा येडी
खूळी चाहूल तुही

काहीली काहीली झाली
बघ म्हव्या मनाची,

वणवण झाली बघ
किती किती माही

सांग कंच वारं
भिनल अंगामंदी,

रात सरना येळ
वैरीण झाली,

चंदाराणी कशी आज
माह्यावर रुसून गेली,

क्षितीज आला सारुन
शेवटी कवडसा सोनसळी,

झाली पहाट गुलाबी,
प्रीत उमलली फुलली,

सांग कंच वारं
भिनल अंगामंदी,

नजरेचा वार नजरेवारी
आरपार लाजेची चिंब ढाल,

लाजुन लाजून चूर झाली,
आली कशी आज,

सांग तुह्या गालावर लाली
तुह्या भेटीची आस,

कशी आता बघ
अशी सैराट..बेफाम झाली.

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143