चिमटा

Started by sanjweli, July 16, 2017, 09:14:06 PM

Previous topic - Next topic

sanjweli

कामा पुरता  मामा
ताका पुरतीच आजी
दही भात खाल्ला सारा
म्हणतात कशी झाली भाजी

पेहराव आहे जसा
तसे नाही हो हे पुढारी
कसला ना ठाऊक यांना वादा
निवेदनाचीही बुडवतात उधारी

चिम्याचा गोम्याचा
भरवसा कुणाचा नाही
अरे के पी. भावा
यांच्यात कुणी चांगलं नाही

खेळा डाव बुडवाबुडवीचा
देवाच्या लाठीचा शेवटी आवाज होत नाही
भोग नंतर भोगा तुमच्या कर्माचा
माझ्या शापाला उ:शाप कोणता मिळणार नाही

बंद केलाय दरवाजा
आधी रोख नको कुठली उधारी
धर्म माणुसकीचा पाळा
चुकवा माझी बाकी सारी

पैसा मागतो माझ्या कष्टाचा
तुमच्यासारखा काळा पांढरा माझ्याकडे नाही
मी काळापहाड सच्च्या जबानीचा
तुमच्या सारखा भिकारचोट नाही

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143