गीत

Started by sanjweli, July 16, 2017, 09:19:06 PM

Previous topic - Next topic

sanjweli

८ एप्रिल २०१७

*गीत*

रंग तुझे,स्वप्न माझे
  मी विस्कटले सारे
बघ शापित बनुनी
भोग सारे आता भोगतो आहे

सारे चुकले माझे
तुझे न काही
मी असा हा पापी
उ:शाप कुणाला ना मागतो आहे

सारे सारीपटातील प्यादे
कुणी वजीर नाही
खेळ नियतीचाच सारा आहे
माझ्या पापाला प्रायश्चित नाही

जन्मो-जन्मीचे तुझे देणे
कधी  फेडणार मी
मृगजळ तू स्वप्नांचे
पाहणार कधी ओअँसिस मी

गीत माझे स्वर तुझे
भेट ती आता कधी ????
स्वप्न अधूरे तुजवीन सखये
बघ सय कशी डोळ्यात उभी.

©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143