लालसा

Started by sanjweli, July 16, 2017, 09:32:43 PM

Previous topic - Next topic

sanjweli

दि. २४/०२/२०१७

* लालसा *

सत्ताकेंद्र अन् खुर्चीची लालसा
नेत्यात आजही जागी आहे

भोळी बापडी,वेडी जनता
खोट्या आशेपायी तोंड आ..वासुन उभी आहे

इकडुन तिकडे उड्या तिकडुन इकडे उड्या
पहा पिं.चि.मनपा,पुणे मनपात कसे झाले आहे

उभी माणसे तीच आता
फक्त पक्षचिन्ह बदलले आहे

फोडाफोडी भाग राजकारणाचा
गेलेला पैसा  वसुल करणं प्रत्येक उमेदवाराचं धोरण आहे

कसलंआलंय समाजकारण आता
राज्यात गरम तक्ख्तापलटाचं वातावरण आहे

आलेख जुळवाजुळवीच्या समीकरणाचा
जो तो आपल्या पद्धतीने मांडत आहे

कसली आलीय ओ... पारदर्शकता
वेळ आल्यावर तुम्हाला पी. डी.पी.हा घटकपक्षही चालतो आहे

खाललेल्या मिठाची माहीत नाही भाषा
आता महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उभा ठाकला आहे

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील.
9422909143