मधुचंद्र

Started by sanjweli, July 16, 2017, 09:35:37 PM

Previous topic - Next topic

sanjweli

मधुचंद्र

शेज सजलेली तू नटलेली
मंद वा-याची झुळुक येई सावकाश

ओल्या मिठीतली फुले सुगंधी
कुरवाळ तू हळुवार सावकाश

धुंद येथ मी झाले अशी
एकवार होऊ दे पुन्हा मला बेहोश

बंधने हातांची माझ्या कुंतलातली सारी
कर मोकळे तू सारे पाष

लाजुनी आली गाली गुलाबी
आज  तुला ना मला पुरता होश

नववधू मी लाजलेली बावरलेलीे
मधुचंद्राची रातही आज मदहोश

महफील चांदण्यांची रंगलेली दंगलेली
वसुंधरा कशी पुनवेच्या रातीला वश
 
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143