धर्म

Started by sanjweli, July 16, 2017, 09:41:53 PM

Previous topic - Next topic

sanjweli

पोटपाणी सर्वकाही
धर्म आमचा ना कोणता
खळगी पोटाची रिकामीच सारी
अनाथांचा नाथ तो
तोच अल्ला,येशु,ईश्वर,आमचा !!!!

देव दगडात नाही
त्याची काया रे निर्जीव
देव माणसात राही
ठेवा आपली श्रद्धा रे सजीव !!!

नाही कुणी वाली
या दीन दुबळ्यांना,
सगळ्यापुढे उभा ठाकला
हा यक्षप्रश्न आमचा

प्राणी पक्षात कसा जातपात नाही
  माहीत नाही त्यांना
भेद स्पृश्य -अस्पृश्याचा
तुच सांग अाता हा
जळता निखारा कुणाचा ?

दलित-सवर्ण,हिंदु मुस्लिम असा
कुणी येथे नाही
मानवता,माणुसकी एकच धर्म आमचा
येथे कट्टरतेला कुणाच्याच थारा नाही
रंग लाल आमच्या सगळ्यांच्या रक्ताचा.


शब्दांकन : महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143