साक्ष

Started by sanjweli, July 16, 2017, 11:11:18 PM

Previous topic - Next topic

sanjweli

आज भुतकाळ सहजच,
समोरुन तरळून गेला,
जुनी गुलाबी आठवण,
अशीच ऊजाळून गेला

जिव्हारी असा वार करुन गेला,
तुझं वर्तमान काय?
माझं वर्तमान काय?
तुझं भविष्य काय?
माझं भविष्य काय?
या नात्याला अखेर नाव काय?
ही जाता- जाता शेवटी,
विचारपुस करून गेला,

मी ही त्याला म्हणालो,
थांब लेकाच्या चाललास कुठे?
माझी अन् तिची दिवस रात्र,
माझे अन् तिचे उन्हाळे पावसाळे,
प्रत्येक क्षणाची साक्ष तू होतास अन् आहेही,
तोही चाचपडला,
निरुत्तर झाला,
कसाबसा शेवटी बोलता झाला अन् म्हणाला,
संसाराचा खेळ मला रे कसा समजणार,
बानु अन् खंडोबासारखी पिरती मला रे कशी उमजणार,

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143