अनाथ

Started by sanjweli, July 17, 2017, 12:06:43 AM

Previous topic - Next topic

sanjweli


दाटलाय अंधार मनी,
झालंय मन एकाकी,
विझल्यात मनाच्या वाती,
पुन्हा कधी च न्  पेटणयासाठी,
पुसटशी झालीयत ती दोन अक्षरं,
घर नावाची .......!
संपलय ते कायमचं... नाजुक हसु ...
डोळ्यात जमाय लागलीत आता आसवं,
क्रुर विधात्यानं ओढून नेलंय,
ते मायबापाचं मायेचं छप्पर,
मला अनाथ करणयासाठी.
महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे