आयुष्य

Started by Devendra Parte, July 22, 2017, 12:27:25 PM

Previous topic - Next topic

Devendra Parte

कधी सुखाच्या सागरात ,तर कधी दु:खाच्या वाळवंटात
कधी यशाच्या शिखरावर,तर कधी अपयशाच्या दरीत
आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
चांगले पत्ते मिळतील की नाही, हे सांगता येत नाही
पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो
या वर सगळं अवलंबून असतं

जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही
जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा,
हा प्रवास म्हणजे आयुष्य

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्यात कधी काय होईल, काही सांगता येत नसते
आयुष्यात तसे नसते काही बेयलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले

         - देवेंद्र पार्टे