सांभाळुनी घेई

Started by विक्रांत, July 22, 2017, 08:06:39 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 सांभाळुनी घेई 
************

चालतो कृपाळा
तुझ्या पथावरी
कृपेची सावूली
वांछुनिया ||

परंतु दाटली
मनात काजळी
उधाण वादळी
इंद्रियांच्या ||

प्रकाश तिमिर
खेळी अडकलो
भ्रमाच्या रंगलो
खेळी सदा ||

शिणले जगणे
थकले चालणे
तव पदचिन्हे
हरवली ||

देई दत्तराया
अटळ विश्वास
सरो माझा श्वास
पायी तुझ्या ||

विक्रांत अडला 
असा आडरानी
प्रभू सांभाळुनी
घेई आता  ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/