तु

Started by Dnyaneshwar Musale, July 23, 2017, 09:49:06 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

श्रावणातली रिमझीम
तु पाऊस धारा,
अंगाला लागणार तु
गार गार वारा.
चिंब भिजल्यानंतरचा
तु कडक चहाचा पेला,
रुद्र लाटांचा
गडुळतेचा काला.
छत्रीच्या एकवटलेल्या
तु तारा,
मुसळधारा पावसाच्या
जोरधार मारा.
भिजलेली रानातली
तु पायवाट
माझ्याशी जुळलेली तु
आयुष्याची गाठ.
हिरवळलेलं तु
माळरान,
श्रावणातलं गोड
केळीचं पान.
संत वाहणारं तु
नितळ पाणी,
कोकिळीच्या आवाजातली
मनमधुर गाणी.
निरभ्र आकाशात झाकुन
येणारे तु ढग,
तुझं माझं निसर्गा सारखं
फुलणारं सुंदर जग.