टाकाऊतुन टिकाऊ केलेल्या सा-या...!!

Started by कदम, July 27, 2017, 10:19:30 AM

Previous topic - Next topic

कदम

बांधुया एक चांगला
प्लास्टीकचा बंगला
एक अतिथी खोली
झोपाळा मजल्यावरी
टाकाऊतून टिकाऊ केलेले सारे...

     प्लास्टीकची खिडकी
     प्लास्टीकचं दारं
     प्लास्टिकचे पंखे
     प्लास्टीचे दिवे
     टाकाऊतुन टिकाऊ केलेले सारे...!!

विटा दोन बाय एकच्या
खेळत्या हवेच्या खोलीला
पुढे असेल हरित बागिच्या
पाणी घालायला तोटया प्लास्टीकच्या
टाकाऊतून टिकाऊ केलेल्या सा-या...!!

   प्लास्टीकचा पेला
   प्लास्टीकचा चमचा
   प्लास्टीकचं छत
   प्लास्टिकच्या पाय-या
   टाकाऊतुन टिकाऊ केलेल्या सा-या...!!