एकटेपण

Started by Ekant, July 30, 2017, 02:06:54 PM

Previous topic - Next topic

Ekant

आजकाल खूप एकटे एकटे वाटतयं

भल्या मोठया गर्दीतही जणू एकांत भासतंय
कल्लोळ आहे पण सर्व काही शांत वाटतयं

खूप माणसे आहेत सोबत
ओळखीचे आणि अनोळखी
प्रेम करणारे आणि द्वेष करणारे
बर वाईट मधला फरक जाणणारे
पण तरी त्यांच्या सहवास दूर जाणवतोय

माहीत नाही काय मन शोधतय
जुन्या आठवणीत कधी रमतयं
काही तरी हातातून निसटलेय
याच दुःख काळजात उठतय
म्हणून मन कश्यासाठी तरी झुरतंय

आता कसे हे मन हलके करायचं
कोणाजवळ मनाचं कवाड उघडायच
बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचंय
माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर
तरी मन आज कुणाचा तरी आधार मागतंय