पांढरेशुभ्र ढग

Started by कदम, July 31, 2017, 10:46:46 AM

Previous topic - Next topic

कदम


ते कोरडे पांढरेशुभ्र ढग वाहात होते
ते मज हिमनगासारखे भासत होते

हळुहळूच ते बदलत दिशा होते
जणू काहीतरी दडवतच होते

आकार त्यांना वेगवेगळे येत होते
वा-यासोबत सारखे ते बदलत होते

एकाआडून एक असा प्रवास करित होते
चाहुल होवू नये कोणाला असे वाहात होते

हिमवर्षेसारखा मज भास करून देत होते
पण समजून घेतले हिमालय येथून दूर होते