डोळ्यातील अश्रू थोडे

Started by कदम, August 01, 2017, 10:28:59 AM

Previous topic - Next topic

कदम


डोळ्यातील अश्रू जपून ठेव जरासे
भाव काही मनातील गुपीत ठेव जरासे

येईल दुःखाचे वादळ आयुष्यावर
पापणीखाली सुखांना दडवून ठेव जरासे...

आला जरी काळ वैरी नको रडू घेवून उसासे
लाटेवर दुःखाच्या स्वार होऊनी हसुन घे जरासे

अश्रूंचे मोल रक्ताशी करून घे जरासे
या रक्तासाठी तरी अश्रूंना आवरून ठेव जरासे

डोळ्यांमध्ये भरून घे वै-यांशी सामन्याला जरासे
अश्रूंना त्या वै-यांसाठी जपून ठेव जरासे