कविता

Started by पल्लवी कुंभार, August 02, 2017, 02:22:48 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

पुस्तकांच्या सागरात
दडली एक कविता
लाटेहून तरल
विहारे स्वच्छंद कविता
घेते रौद्र रूप
असंतोषी कविता
घाली साद आसमंतात
पावसाळी कविता
गुंतली भावनांत
माहेरवाशी कविता
लागे ओढ परमेशाची
भक्तिमय कविता
एकटेपणाला सोबत
विरह कविता
साजिऱ्या रूपावर घडते
शृंगारिक कविता
दिल्या वचनांना जागते
तीरावरली कविता
होता आभास तिचा
घडते ती कविता
तोडता रेशीमबंध
डोळ्यात वाचते कविता
वात्रट फुशारकीस
खेचते खाली वात्रटिका
येते उधाण अंतरी
वाचता प्रेरणादायी कविता
हसून वेडी लोळवते
विनोदी कविता
लागून विषयाला विस्तारते
गंभीर अशी कविता
बडबड गीतात खेळते
लहानशी कविता
शांततेला वाचा फोडते
कधी एक कविता
रंगात रंगते सणांच्या
देखणी कविता
कागदावर उमटते
मनातली कविता
शब्दांच्या अस्तित्वात
रुजते कविता

~~ पल्लवी कुंभार ~~