सांजवेळी

Started by १. मनिषा गुर्जर, August 03, 2017, 11:49:46 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

सांजवेळी एक हाक कानी
कोणाची असेल ती गुढ वाणी?
वनवा पेटला उभ्या रानात
पण नुसतीच कुजबुज कानात

सांजवेळी आग वनी
चाहूल तिची पानोपानी
मन सारीच  गारठलेली
कशी तिची धग यावी तनी?

सांजवेळी गात गाणी
वहात होते झुळझुळ पाणी
देह कितीतरी त्या पाण्यात
मोडले नाही जे वणव्यात

सांजवेळी चंद्र  गगनी
अंधार दाटला परी मनी
चमकणारया त्या गगनी
मग्न नवे तारे जागा शोधण्यात

सांजवेळी शांतता स्मशानी
गेली ती हाक विरुनी
आसवे आता नाही  डोळ्यांत
वणवे विझले त्या पाण्यात

मनिषा गुजर

जे.डी.भुसारे