दोष हा कुणाचा ?

Started by Asu@16, August 06, 2017, 12:36:22 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   दोष हा कुणाचा ?

जग हे सुंदर, भव्य मंदिर
भासे कुणा क्रौर , भयंकर
          दोष हा कुणाचा ?
मधुगंध विभूषित, गुलाब सुंदर
सर्वांगापरि कंटकलंदर
          दोष हा कुणाचा ?
कुणा मिळे गुलाब सुंदर
काट्यात कुणाचा वाटा
          दोष हा कुणाचा ?
तुझा नि माझा, नसे कुणाचा
दोष असे हा दुर्दैवाचा
             दोष ना कुणाचा.

- अरूण सु.पाटील
(मैफल - १.४.१९८० गोमंतक मराठी साहित्य संमेलन व वर्धापन दिन विशेषांकात प्रसिद्ध)

https://www.facebook.com/AsuChyaKavita