मनबावरी

Started by Anil S.Raut, August 09, 2017, 07:23:54 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

:::::::: मनबावरी ::::::::

गाणं काळजाचं तिच्या
गेलं गेलं कानावरी
ओलावल्या पापण्यांनी
दिल्या धाडुनिया सरी!

किती सोसला विरह
किती जाहल्या वेदना
विरघळला पाहुनी
मनबावरी यातना!

सरीवर सरी आल्या
चिंब ओली झाली काया
अंतरीच्या बागेमंधी
कळी लागली फुलाया!

मिसळूनि आसवांत
गेला आसवांचा पाट
हळूवार मिलनात
धारा-ओहोळाचा थाट!

तृष्णा शमवुनी पाहे
पाहे ओल्या किरणांनी
नवतीच्या नव्हाळीचं
रुप तृप्त नयनांनी !

         अनिल सा.राऊत
         9890884228