सत्य

Started by Anil S.Raut, August 09, 2017, 07:28:30 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

::::::: सत्य :::::::

धावत पळत बायका
जात असतात सार्वजनिक नळावर
फाटक्या-तुटक्या पायांनी..
रांग भराभर वाढत जाते रोजच
अन्
पाणी कुपोषित असते रोजचेच...
कधी काविळ होते-
कधी कधी जुलाबही होतात पाण्याला!
पण,
मुनशीपालटी करत नाही दवापाणी
किंवा
पुरवतही नाही
पौष्टिक खाद्य कुपोषित पाण्याला!
पाणी कमी अन् शिव्यांची लाखोलीच
वाहत असते जास्त
सार्वजनिक नळावर!
...कधी कधी रक्तही वाहते
झिंज्या उपसलेल्या डोक्यातून..
..त्याचवेळी दूर दूर
पण फार दूर नाही
अगदी झोपडपट्टीला चिकटून
स्वच्छ आणि नितळ पाण्याचा
धबधबा वाहत असतो-
शॉवरमधून!

                अनिल सा.राऊत
               9890884228