खेळ....

Started by Pratej10, August 10, 2017, 09:00:03 PM

Previous topic - Next topic

Pratej10

खेळ....

जिथे मांडला खेळ प्यारा
का नाही संपवला तो तिथेच सारा
का जोडलं आयुष्य या खेळाशी ....
नव्हतीच जर इच्छा तुझी खेळण्याची ...

तो खेळ तुझ्यासाठी फक्त खेळ होता
पण वेड्या का नाही कळल तुला
तो कोणासाठी तरी जीवघेणा होता.....   

नसती केली सलगी...
नसता लावला ध्यास...
का दिला सतत विश्वास
हा खेळ जिंकण्याचा...
जेंव्हा तुला माहित होत...
कि हा भिडू नव्हता तुझ्या जोडीचा...

@प्रतेज