फ़क्त तुझ्याकरता

Started by sumedh thool, August 10, 2017, 11:06:41 PM

Previous topic - Next topic

sumedh thool

फ़क्त तुझ्याकर्ता

येत नाही कविता तरी लिहाविशी वाटते
तुझ्याकरता काहीतरी कराविशी वाटते
दूर असताना तू खुप आठवते
जवड असल्यास मला फार बर वाटते
मनातल्या प्रत्येक गोष्टी विचार भावना तुला सांगवायास वाटते
सांगुन तुला अनेक गोष्टी मन हलके वाटते
तुझ्याशी भेटण्याची नेहमी आतुरता असते
कळत नाही मनाला तुझाच छन्द लागलेला असतो
तू जिथे असावी सुखरूप असावी अशी मनाला चिंता वाटते
तुला नवनवीन ठिकाणी निसर्गाच्या आडोश्याला घेउन जायच वाटते
तुझा हसता चेहरा निरंतर पाहवत रहावस वाटते
तू दूर असतानाही मनात तुझाच ध्यास असतो
प्रेमाच्या प्रकरणात गुंतून गुंतून कुठेतरी हरविल्यासरखे वाटते
जवड तू राहिली की आपण जग जिंकल आहे असे वाटते
नशिबात असेल तुझा साथ तर नक्की काहीतरी करवून दाखवेल मी अशी आशा वाटते
तुझ्या आनंदातच आपला आनंद हे माझ्या मनाला माहित आहे..
ही कविता तुम्हाला कशी वाटते ...

सुमेध थूल
7385056693





Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]