हुरहूर

Started by १. मनिषा गुर्जर, August 11, 2017, 09:07:27 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

अंगणात माझ्या पारिजात बहरुन आला
एक तुझा नेत्रकटाक्ष वेड लावुन गेला
पावसात गंध मातीला आला
पहिल्याच प्रेमाचा हळूवार स्पर्श मनास झाला
बोचरा वारा पायंदळी फुलं सारी तुडवुन गेला
एक तुझाच दुरावा हुरहूर लावून गेला
सुवास पारिजाताचा दरवळून आला
तुच तू एक मला मोहवून गेला
आठवण येताच तुझी मन भरुन आले
तू दूर गेल्यावर प्रेम मला तुझे कळुन आले