नकोच करू तु प्रेम

Started by Dnyaneshwar Musale, August 12, 2017, 08:16:58 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

नकोच करू तु माझ्यावर प्रेम
तुला वाटत मी ही तुझ्यावर करावं प्रेम
हो पण मी करणारच नाही
तसच तु ही नको करू आपलंसं करण्याचा प्रयत्न.

तुझंही आता वय झालंय कर एखाद्या सुज्ञ
मुलाशी प्रेम पण माझ्या घराकडं वळुनही बघु नकोस
बघितलं तर दिसेल पाचटाच्या भिंती मधुन निघत
असलेला घुटमळलेला धुर.

जवळ येशील तर भासत असलेली भिंतही
तिथे नसेल,
घरात चार पायावर उभी केलेली खाट तिथुनच
स्पष्ट दिसेल.
घरात घुसुन तिच्यावर बसावं असं येईलही तुझ्या मनात,
पण तुझ्या घरातल्या मऊ मऊ सोप्यासारखी मुळीच नाही,
भोक पडलेल्या जुन्या पोत्यांनी घेतलंय फक्त बुराख
पडलेल्या संसाराला  झाकुन.


किचन वैगेरे तर माझ्या घरात नाहीच
दिसेल तुला एक चुल अनं त्यात भरलेली राख
कोपऱ्यात पडलेलं  वाळलेलं सरपण
तुझ्या कोवळ्या हातांना कुऱ्हाड चालवणं तर जमणारच नाही,
अन मलाही भरलेल्या वायुच जळण करणं त्यामुळे तु आता जास्त
घरात डोकावण्याचा प्रयत्न करूच नको.

आता तु घराला लांबूनच राम राम करून
निघुन जा,
माझी सायकलच पुर्ण बरबटून घरी पोहचते,
थंड गार पाण्याने मी माझ्या पेक्षा तिलाच जास्त अंघोळ घालतो,
मग तुझी गाडी जीर्ण झालेल्या माथ्यावरूनच माघे घेऊन जा.

आणि परत तु मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस
कारण मी कधीच तुझ्यातून बाहेर आलोय
आता फक्त दिसतायेत तिरकस नजरेने डोकावणारे सोनेरी सुर्यकिरणे
आणि चोहीकडे मला बोलावणारा प्रकाश.