स्वप्न

Started by १. मनिषा गुर्जर, August 15, 2017, 12:01:51 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

ये बहरली रात्र, पापण्या घे मिटून
नयनमनोहर  समोर तो रस्ता शोध मजला
तिथे वाट पहाते मी, साजना तुझी

दूर स्वप्नांच्या गावी, तुझे माझे रमले रे मन
नसे बंधन, नाही उगी रोकटोक
आनंदाच्या वनात दोन जीवांचे गुंजन

गाणे गाते हवा, जीव वेडा गुंतला
राजसा, नको दुरावा या समयी
भेटले निवांत क्षण थोडेसे


स्वप्नात, रमले मी रे साजन
किती गायली गाणी आपण
नको तुटायला स्वप्न , बंदच ठेव लोचन.