साद

Started by १. मनिषा गुर्जर, August 16, 2017, 05:11:58 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

रणरणत्या उन्हात मन बैचेन
दूर तू सावलीसारखी भासली
साद तुला घालीत पळीत मी
भान हरपून सारे बसलो

हाती गवसेना ती दुरदूर गेली
तुझीच छाया ती फसवून गेली
मिठीत त्या तळपणारया रवीच्या मी
जीव कासावीस, मी जळून गेलो

त्या राखेतून मम देहाच्या
पावले पडली तुझी एकदा
तुला भेटण्याची लालसा मनी
हाक मारली, पण तू पुढे निघून गेली.