Ti sadhya ky krte.

Started by Meghesh, August 18, 2017, 11:18:15 PM

Previous topic - Next topic

Meghesh

ती सध्या काय करते..

शाळेत भेटते कुणी एखादी..
पण शाळेसोबतच संपते..
मनात प्रश्न येतो कधीतरी,
ती सध्या काय करते ?
शाळेनंतर college मध्येपण,
मन कुणावर तरी येते..
पण collegeच्या syllabus सारखी,
ती सुद्धा अर्धवटच राहते..
मग वाटतं कधीतरी,
ती सध्या काय करते ?
पहिल प्रेम ..
पहिली चाहुल ..
मन तीलाच पाहून देते..
वेडं मन आपलं ती अलगद चोरून नेते..
पण ती काय बोलेल ?
हो की नाही बोलेल ?
यामुळे तीला कळतच नाही ..
लिहलेली पत्र हजार,
तीला मिळतच नाही ..
प्रेम असते पहिलं ती,
पण आठवण बनुन राहते..
अन् शांत रात्री ,
चांदणे पाहुन विचार येतो..
ती सध्या काय करते ?
ती सध्या काय करते ?
-मेघेश सावंत📕

rpnath