तिरंगा

Started by Asu@16, August 19, 2017, 08:07:33 PM

Previous topic - Next topic

Asu@16

            तिरंगा

केसर, प्रतिक बलिदानाचा
शुभ्र, अहिंसा अन् शांतीचा
हरित, उद्याची स्वप्ने देतो
         गगनात तिरंगा तळमळतो

पहाट झाली स्वातंत्र्याची
अंधार अजुनि रेंगाळतो
विकासाचा प्रकाश अडतो
         गगनात तिरंगा तळमळतो

आस उद्याची आपुल्या हाती
अंधाराच्या सरतील राती
प्रकाशाची वाट पाहतो
         गगनात तिरंगा तळमळतो

प्रणाम तुजला भारत देशा
उजळो भाग्य, एकच आशा
दशा पाहुनि जीव गुदमरतो
         गगनात तिरंगा तळमळतो

देशाची जरी असलो शान
वंदन करुनि देता मान
उत्साह देही ना फुरफुरतो
         गगनात तिरंगा तळमळतो

टिळक, गांधी, नेहरू, जयप्रकाश
सावरकर, भगतसिंग आणि सुभाष
लक्ष्मी, राणा, शिवराय स्मरतो
         गगनात तिरंगा तळमळतो

- अरूण सु.पाटील
   
https://www.facebook.com/AsuChyaKavita