तु

Started by Dnyaneshwar Musale, August 20, 2017, 08:01:43 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

अक्षरांतुन स्फुरणारी
तु एक ओळ
इंद्रधनुच्या रंगाची
बोलकी तु माळ.

श्रावणातली सह्याद्रीची
सुमधुर  मैना
नजरेत  स्मरणारी
तु मृग नयना.

अलगद फुलणारे
कापसाचे बोंड
गुलगुल बोलणारे
तु वाढीव तोंड.

फुलातला गोडीचा
सुगंधी गाभा
माझ्या ह्रदयावर
घेतलेला तु मनसोक्त ताबा.


आयुष्याच्या घडीवरची
तु मुलायम सतरंजी
तुझ्या आठवणीची
बनलेली ही कवितेची गोड गंजी.