* एक *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 23, 2017, 09:33:50 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एक
एकाकी मन एकाकी भाव
एकट्या जीवाचा एकला प्रवास
एकांतातुनी मिळे एकच नाव
एकेरी वाटेचा एकटाच गाव
एका आठवणीचा एकच घाव
एका दगडाचा एक देव
एकल्या काळजाची एेक आर्जव
एका वेळी एकदातरी पाव
एका क्षणालातरी एकदाच गाव
एकाएकी नाही एकदमच याव
एक कातरवेळी एकरुप व्हावं.
कवी - गणेश साळुंखे
Mob - 8668672192