आठवण

Started by sneha31, August 28, 2017, 05:33:38 PM

Previous topic - Next topic

sneha31


विचार नसतांना दररोज तु स्वपनात माझ्या येतो
चांदन्या  रा त्री  आठवणीत दिवस उजाडुन जातो
तु सोबत असतांना शब्द तुझे स्पर्श करुनी जातात
जणु मोहपाशात तुझ्या अडकुणी जातात

मनाच्या साठवणीत बरच काही असत
पण तु समोर येताच शब्दही अबोल होतात
का कुणास ठाऊक अवघड होत तु नसल्यावर
जास्ती काही नकोय मला तुझ्याकडन
फक्त सहवास तुझा हवाय मला आयुष्यभर

आयुष्य संपेल पण प्रेम मात्र असणार
मी नसतांना आठवण माझी तुझ्या सोबत राहणार
कळतच नाही  अजुनही तुझ माझ नात
नकळतच गुंतत गेलो एकमेकांच्या श्वासात

कधी असले जरी मी रागात तरी
तुझे बोलके शब्द हसवुणी जातात
आवडेल मला तुझ्या आठवणीत जगायला
जिथे कुठे मी असणार येणार तुला भेटायला

स्नेहा माटुरकर

sumedh thool

khup chhan..kavita vachun mla athavn zali..

sneha31


sumedh thool