पण काहीही म्हणा...एका तपाची गोष्ट

Started by शिवाजी सांगळे, August 31, 2017, 09:40:00 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा...

एका तपाची गोष्ट

आरोप प्रत्यारोपाच्याच फैरी
आता सर्वत्र झडू लागतील,
सर्वजण येथे मात्र कौतुकाने
स्वतःची पाठ थोपटून घेतील!

एक तप उलटून जरी गेले
अनुभवाचे धडे कोण घेईल?
बुडली जरी मुंबई पाण्यात
जबाबदारी ढकलली जाईल!

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९