युगांची बंधने

Started by jayshree jadhav-mali, September 01, 2017, 04:54:29 PM

Previous topic - Next topic

jayshree jadhav-mali

युगांची बंधने सारी तशीही पाळते आहे
नव्याने कुंपणे काही स्वतःला घालते आहे

प्रसंगी भांडते थोडी कधी माघार घेते मी
हवे ते घेउनी बाकी नको ते टाळते आहे

नको वाटेवरी पेरू पुन्हा काटे सराटे तू
ठणकती पावले माझी जपूनी टाकते आहे

कुणाशी वैर ना माझे कुणाशी वाद ना माझा
कधी वैताग आला तर स्वतःशी भांडते आहे

तुझ्या छायेत आले नी स्वतःला पारखी झाले
हरवले नेमकी कोठे कधीची शोधते आहे
     
                              जयश्री जाधव