चाहूल यातनांची

Started by Ashok_rokade24, September 01, 2017, 11:41:40 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

चाहूल यातनांची लागली ,
जीवन मजवर हसले ,
उघड्या डोळ्यांनी मला ,
मरण माझे दिसले ॥

सौख्याचा काळ भरास ,
जिवापाड नाते जपले ,
अवघड प्रसंग येता ,
सारे दूर झाले ॥

साथ आयुष्य भराची ,
मने विटून गेली ,
वाट अर्धी राहीली ,
पाउल अडखळले ॥

माझे माझे करीत आलो ,
कुणी माझे न राहीले ,
स्वप्नांची होळी झाली ,
मन विदीर्न झाले ॥

स्तंभ आधाराचे निखळले ,
वाचा मूक झाली ,
एकले पण सोबतीला ,
हाती शून्य ऊरले ॥

23/6/2017    अशोक मु. रोकडे.
                         मुंबई.