सारीती दूर सारे ........

Started by Ashok_rokade24, September 01, 2017, 11:53:36 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

सारीती दूर सारे ,
आपुले म्हणावे ज्यांना ,
वर्मी घाव जयांच्या ,
वेदना ज्ञात त्यांना  ॥

जाणीव ज्यांना जीवाची ,
माणसे हरपून गेली ,
विळखा स्वापदांचा ,
भक्ष्याची चिंता त्यांना  ॥

उपभोग  सुखाचा घेती ,
आनंदे जीवन फुलविती ,
जे राबती तया प्रती ,
शेज लाभे शुलांची त्यांना  ॥
                         
विसरून माणसाला ,
स्वार्था मागे धावती ,
जे करिती नीत प्रिती,
जाती विसरून त्यांना  ॥

                        अशोक मु. रोकडे.
                         मुंबई.