अखेरच्या क्षणी .......

Started by Ashok_rokade24, September 01, 2017, 11:57:47 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

सारून स्वप्ने सारी ,
साथ सर्वदा दिली ,
ऊध्वस्त आयुष्य सारे
जाणीव कुणा न झाली ,

निज सुखाची तुमची ,
हर्ष सदा असे स्वप्नी ,
भकास नेत्र नित माझे ,
रात्र सारी ऊलटून गेली ,

मिष्ठान्न नीत मिळता ,
काया सदा सुखावली ,
रिकामी खळगी पोटाची ,
जाणीव कुणा न झाली ,

शीतल छाया सतेज काया ,
सुखात नीत रमली ,
भरजरी वस्त्रा आडून ,
लक्तरे न कधीच दिसली ,

लपवून गाठोडे दुखा:चे ,
सुख नीत वाटीत आलो ,
आयुष्य सारे सरले आता ,
एकांती ढाळीत अश्रू बसलो ,

                          अशोक मु. रोकडे .
                            मुंबई.