चांद रातीला ...

Started by Ashok_rokade24, September 02, 2017, 12:06:09 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

चांद रातीला ऊजेडी ,
साथ सार्‍यांची लाभली ,
परी काळोखी हरवून जाता ,
सावलीनेही साथ सोडली ॥

चिंता करता मन शिनले ,
वाहून ओझे शरिर थकले ,
आधारास शोधीली काठी ,
तीलाही वाळवी लागलेली ॥

छप्पर चिरेबंद माथी ,
परि निवारा हरवून गेला ,
चैन न मिळे जीवाला .
जरी वर्दळ सभोवताली ॥

वाटीता सुखे सारी ,
झोळी रिकामी झाली ,
आयुष्य संपले सारे ,
चिंता ऊद्याची लागली ॥

                   अशोक मु. रोकडे.
                    मुंबई,