लागतो वेळ ना

Started by शिवाजी सांगळे, September 02, 2017, 02:02:14 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

लागतो वेळ ना

झाडे वाढण्यास लागतो वेळ ना
कळी फुलण्यास लागतो वेळ ना

सुर्य उगवण्याच्या प्रतीक्षेत सारे
रात्र सरण्यासही लागतो वेळ ना

आस तुला सखये होतीच माझी
जुळण्यास मनेही लागतो वेळ ना

विसरून गेली मजला तु एकाकी
आठवाया पुन्हा लागतो वेळ ना

शोधला जरी ईलाज जखमेवरचा
भरावया जखमा लागतो वेळ ना

परीक्षाच घेतली माझी जीवनाने
निकालास तीच्या लागतो वेळ ना

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९