बाबा

Started by १. मनिषा गुर्जर, September 03, 2017, 09:31:42 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर


मला माफ करा बाबा
मी तुम्हाला ओळखले नाही
तुम्ही गेल्यावर महत्व कळले मला
मी कधी ते जाणले नाही

आईच्या कुशीत मस्तीत होते
स्वप्नांच्या दुनियेत रमले होते
प्नेम माझे तुमच्यावरही होते
पण तुम्हाला दाखविले नाही

तुमच्यामुळ मी सुखात नहात होते
पण तुम्ही मात्र कष्ट करत होता
घरात दिसत नव्हता तेव्हा
मी मात्र घर डोक्यावर घेत होते

आई आई ओठी होते
पण तुम्हीही सदैव मनात होता
आम्हाला डोळयात ठेवून
तुम्ही परगावी दिवस काढित होता

आज तुम्ही खुप आठवता बाबा
आमच्यासाठी  तुम्ही किती खस्ता खात
लाडाकोडाने आम्हाला मोठे केले
आम्हांला तुमच्या  प्रेमळ छत्रात जपले