प्रश्न

Started by १. मनिषा गुर्जर, September 03, 2017, 09:43:47 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

रुप तुझे लाजरे
मन तुझे बावरे
बोल तुझे लपले मनात
मन तुझे गुंतले कशात?

असे चांगले नाही गुंतणे
जीवन होते दुखणे
दुखरया असतात वेदना
पण न मानीती भावना

भावना का अशा छळतात ?
मनं अशा जाळतात ?
जळणे ते व्यर्थ असते
पण मरण्यातही अर्थ असतो

प्रश्न  कितीतरी उगीचच शोधतात ऊत्तरे?