फार झाले

Started by श्री. प्रकाश साळवी, September 05, 2017, 12:23:31 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

फार झाले !
-----------
काय झाले फार झाले
बोलणारे गार झाले
**
प्रीत माझी लाखखाणी
मारणारे यार झाले
**
शांतता आहे कुठे हो ?
आततायी फार झाले
**
पोसले रे बालकांना
पाळणारे भार झाले
**
वाकलो मी उपकारे
तारणारे ठार झाले
**
दांभिकाचा सोस आहे
सोसणारे हार झाले
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१२-०८-२०१७
वेळ : १८:२८