बोल काही !!

Started by श्री. प्रकाश साळवी, September 05, 2017, 12:34:59 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

बोल काही !
••••••••••••••••••
बोलणारे बोल काही
तोडणारे बोल काही
**
भेटती का नाडणारे?
झोंबणारे बोल काही
**
तू असा काय घूमा
अंतरीचे बोल काही
**
सूर काही तारकांचे
भावनांचे बोल काही
**
भांडणारे भांडताती
ऐक्यतेचे बोल काही
**
सावकारी पाश आहे
तारणारे बोल काही
**
प्रेमरज्जू बांधलेले
भावनांचे बोल काही
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१३-०८-२०१७