सोबतीला तू हवा

Started by jayshree jadhav-mali, September 05, 2017, 05:05:10 PM

Previous topic - Next topic

jayshree jadhav-mali

सोबतीला तू हवा

पावसाने छेडताना सोबतीला तू हवा
थेंब ओले झेलताना सोबतीला तू हवा

मागते मी फार कोठे?हात दे हाती तुझा
बिकट वाटा चालताना सोबतीला तू हवा

संकटांचा भार सारा एकटीने पेलते
पण सुखांना तोलताना सोबतीला तू हवा

दुःख सारे लपवतो हा चेहरा हसरा जरी
आसवांना ढाळताना सोबतीला तू हवा

पावलांनी पाळल्या कुरपांत या जखमा जुन्या
त्या नव्याने खोलताना सोबतीला तू हवा

आठवांवर चालती जे रोज तू नसला तरी
श्वास वेडे थांबताना सोबतीला तू हवा

                     जयश्री जाधव