कॉकटेल

Started by शिवाजी सांगळे, September 07, 2017, 04:28:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कॉकटेल

झुडपात कधी बनात ती प्रसवते पहा ना
फुटतो आहे काट्यांचा बाभळीस पान्हा

धाडले होते पूतनेस कंसाने घात करण्या
स्तनपान करोन गोकुळात वाढला कान्हा

चमत्कार आहे पहा निसर्गाचा येथे कसा
शकून देताना येतो म्हणे काक पाव्हणा

ग्रह दहावा जरी म्हटले कोणी जावयासी
लग्नानंतर खरा भाव खातो मात्र मेव्हणा

मटण रश्या सोबत भाकरी चाले घाटावरी
साथ देई कोकणात छान मऊसुत घावणा

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९