पावसा सारखीच तू ही

Started by Devendra Parte, September 08, 2017, 08:38:42 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

पावसा सारखीच तू,माझ्या जीवनात आलीस
अन् मन हे माझं,चिंबचिंब भिजवून गेलीस

तुझ्या येण्याने जीवनात, नवी पालवी जनू फुटली
अन् तुझ्या प्रेमाची वेल,माझ्या मना भोवती बिलगली

तू समोर आलीस की, मन कविता काय रचू लागतं
स्वप्नांचा झुल्यात, गगन भरारी काय भरू लागतं

त्यास कुठे ठाऊक होतं, तू ही पावसा सारखीच निघून जाशील
मातीच्या ओल्या गंधाची हूरहूर मागे सोडून जाशील

तेव्हा पासून हे मन,वाट बघतय तुझी
जशी रणरणत्या उन्हाळ्या नंतर
जमीन वाट बघते पावसाच्या त्या पहिल्या सरीची

          - देवेंद्र पार्टे