फक्त एव्हढंच

Started by Asu@16, September 11, 2017, 12:01:50 PM

Previous topic - Next topic

Asu@16

         फक्त एव्हढंच

भावना मानल्यातर अनमोल
न मानल्यातर बिनमोल
फक्त एव्हढंच,
मानणारा माणूस असतो
न मानणारा अमानुष असतो

नाती मानली तर मोती
न मानली तर माती
फक्त एव्हढंच,
मानणारा माणूस असतो
न मानणारा अमानुष असतो

प्रेम मानले तर स्वर्ग
न मानले तर मर्त्य
फक्त एव्हढंच,
मानणारा माणूस असतो
न मानणारा अमानुष असतो

देव मानला तर मोठा
न मानला तर गोटा
फक्त एव्हढंच,
मानणारा माणूस असतो
न मानणारा अमानुष नसतो.

- अरूण सु .पाटील 

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Shrikant R. Deshmane

देव मानला तर मोठा
न मानला तर गोटा
फक्त एव्हढंच,
मानणारा माणूस असतो
न मानणारा अमानुष नसतो.

khup chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]