ती, पाऊस आणि आठवणी

Started by suryawanshirohit28, September 11, 2017, 11:35:43 PM

Previous topic - Next topic

suryawanshirohit28

आवडेल का तुला कधी ,
पुन्हा जुन्या आठवणीत रमायला ,
तुझ्या मनातलं स्वच्छंदी बोलायला ।।

आठवतांना सोबतीचे  दिवस तुझे,
क्षण ते आनंदाचे , लहरी पणाचे. 
आभाळापरी त्यांस  सीमा नसावी,
ओढ त्या नभी मेघांची असावी.

बिजली त्या आठवणींची,
मेघांमध्ये कडकडावी. 
आस त्या सरींची,
मनी फक्त उरावी. 

बरसावे त्यांनी  ही उत्कंठेनं , 
आठवणीत  आपल्या.
सुखाचे सोबती  स्पर्शुनी,
जाव्या रोमहर्षाला.

दुथडी भरून  भावनांचे तरंग,
हृदयरुपी डोहातून उडावे.
नकळत डोळ्यातून ते,
अलगद वाहावे.

मोहोर त्या क्षणांना प्रवाहाने यावे ,
जणु संपूर्ण आयुष्य त्याने व्यापले जावे .

आज हि आठवणीत ,
रमतोय तुझ्याचं .
खरच नाही  का  जमणार तुला ,
तुझ्याच मनातलं बोलायला.


रोहित सूर्यवंशी
नाशिक
9767717036
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

akanksha

Khuuuuuuuup masta👌👌👌👌👌💐😢😍

Shrikant R. Deshmane

आठवतांना सोबतीचे  दिवस तुझे,
क्षण ते आनंदाचे , लहरी पणाचे. 
आभाळापरी त्यांस  सीमा नसावी,
ओढ त्या नभी मेघांची असावी.

khup chan rohitji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

suryawanshirohit28

रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036