लास्ट बेंच मित्र मंडळ

Started by dhirnam, September 12, 2017, 12:49:21 PM

Previous topic - Next topic

dhirnam

शेवटच्या बाकाची गंमत काही न्यारी होती
शाळेतली सगळ्यात पक्की इथेच तर यारी होती

इथल्यांच्या डोक्यात इनोवेशन ची सतत वर्दी होती
बाकी पुढच्या बेंच वर सगळी मंदारांचीच गर्दी होती

इथे प्रत्येकाचीच कुणीतरी सेट होती
तिरप्या नजरेतुन केलेली ती नाजुकशी भेट होती

सरांच्या जाण्याला आणि मॅडम च्या येण्याला इथेच तर रंगत होती
मधल्या सुट्टी आधीच डब्यांची चोरटी पंगत होती

राहूया सोबत शेवटपर्यंत इथेच घेतलेली शप्पथ होती
वेगळे होताना अश्रू सर्वांचे हिच गॅंग तर टिपत होती

आजही भेटला तो बाक तर थोडावेळ पुन्हा बसुया
मित्राने दिलेल्या प्रश्नार्थक उत्तरावर दात हसुया

बाकावरच्या रेघोट्यांना पुन्हा कुरवाळुया
आठवणींच्या जंगलात पुढे मागे पळुया

आजही त्या बाकांवर फिल्मी ठेका धरूया
कवितांची गाणी आणि गाण्यांची भजनं पुन्हा एकदा करूया

या सगळ्यांनी पुन्हा एकत्र .... जोपर्यंत आठवण जागी तरी आहे
अजूनही लास्ट बेंच मित्र मंडळ .... पक्की तेवढीच आपली यारी आहे

©Copyright, 15.01.2016, Created By Sudhir Potdar

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]