धुंदीत वाहतांना ........

Started by SHASHIKANT SHANDILE, September 12, 2017, 04:01:16 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

धुंदीत वाहतांना हरवून भान होतो
ती ओढ होती कसली मी बेभान होतो
आज वाटते ते अनोडखेच स्वप्न
स्वप्नाच्या जगाशी मी अनजान होतो

मी लागलो वाहाया मज पोहता न येई
डुबण्या जणू मलाही तेव्हा होती घाई
कुठे जाण होती त्या गोड कंटकांची
रुतवून घेतले जे खोट्याच प्रेमापाई

तो काळही अचानक रडवून आज जातो
जपलेल्या आठवणींनी भरून उर येतो
उधळून सारे स्वप्न काढलेत नशिबाने
पुन्हा नव्याने तुटण्या स्वप्नांचा पूर येतो

नको मला तो आता त्या नजरेचा इशारा
पुन्हा कशाला शोधू तो वाहता किनारा
भिजवून घेतले मी हे अंग आसवांनी
सावरून आता घेतो हृदयातला पसारा
-------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!